‘ ‘काळ’मेकर लाइव्ह’ : या कादंबरीत जागृत आणि तीक्ष्ण समकालीन भान स्पष्टपणे दिसते, समकालाचे विरूप दर्शन कलात्मक पद्धतीने घडते...
आजचे विस्कळीत आणि प्रदूषितही सोशो-पोलिटिकल-कल्चरल वातावरण ‘ब्लॅक ह्युमर’च्या अंगाने चिमटीत पकडण्यासाठी असा हटके प्रयोग आवश्यकच म्हटला पाहिजे. ही कादंबरी आजचे आभासी वास्तव मांडत आहे. ही कादंबरी वाचताना जगण्याचा ठोसपणा लयाला जात असल्याची, जगण्याला आलेल्या विसकळीतपणाची, जगण्याच्या कृत्रिमतेची, मूल्यभान लोप पावत चालल्याची जाणीव तीव्रपणे होते, हे तिचे श्रेय म्हटले पाहिजे.......